
हृदय आणि कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेली मुले आणि त्यांच्या पालकांसाठी मलबार हिल येथील नंदनवन या शासकीय निवासस्थानी आयोजित दिवाळी स्नेह मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व आरोग्यदूत फाउंडेशन यांनी एकत्र येऊन हा मेळावा आयोजित केला होता. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, टीव्ही 9 मराठीचे इनपुट एडिटर मोहन देशमुख, न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, झी २४ तासचे संपादक कमलेश सुतार, साम टीव्हीचे संपादक निलेश खरे, जय महाराष्ट्रचे संपादक प्रसाद काथे, एनडीटीव्ही मराठीचे जितेंद्र दीक्षित, लोकशाही न्यूजच्या संचालक अंजनी नायडू, एबीपी माझाच्या संपादक श्रीमती सरिता कौशिक आणि लोकसत्ताचे माजी सहयोगी संपादक संदीप आचार्य यांच्यासह उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे तसेच विविध माध्यमांचे प्रतिनिधी, डॉक्टर, उपचार घेतलेल्या बालकांचे पालक आणि मान्यवर उपस्थित होते.
कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेल्या आदित्य ठोसर याने लिहिलेल्या ‘माय वर्ल्ड ऑफ साउंड’ या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. मुलांना नवीन आयुष्य देणाऱ्या डॉक्टरांचा तसेच माध्यम प्रतिनिधींचाही यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.