मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील ‘अमृत ०२’ योजनेअंतर्गत सुरू असलेली विकासकामे आणि पोहरा नदीचे प्रदूषण निर्मूलन व पुनरुज्जीवन याविषयी आढावा घेतला. या अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे मार्च २०२७ पर्यंत गतीने आणि गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते इंदोरा-दिघोरी उड्डाणपुलाचे लोकार्पण डिजिटल पद्धतीने करण्यात आले.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत सर्वसामान्यांची विश्वासार्ह लोकवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाने आता लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासाच्या क्षेत्रातही नवी झेप घेण्याची तयारी केली आहे. खासगी आराम बससेवांकडे वळणाऱ्या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी लवकरच महामंडळाच्या ताफ्यात स्वमालकीच्या २०० अत्याधुनिक, वातानुकूलित व्होल्वो बसेस दाखल करण्यात येणार आहेत.
नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील अवाडा ग्रुपच्या प्लांटला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन तेथील सोलार पॅनल निर्मिती प्रक्रियेची पाहणी केली. तसेच, कंपनीच्या इतर प्रमुख उत्पादनांची आणि उत्पादन प्रक्रियेची माहिती जाणून घेतली.
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध देशांच्या महावाणिज्यदूतांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व महावाणिज्यदूतांचे स्वागत करून त्यांच्यासमवेत श्री गणेशाची पूजा केली.