
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत हा करार झाला.
एसटी महामंडळाच्या सुमारे १५ हजार ४०० चौरस मीटर जागेपैकी उर्वरित १० हजार ५०० चौरस मीटर जागेवर सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) अत्याधुनिक बस पोर्ट, बस टर्मिनस, पार्किंग आणि व्यावसायिक सुविधांचा विकास करण्यात येणार आहे.
मेट्रो, रेल्वे आणि एसटी स्थानकांची एकात्मिक जोडणी झाल्यामुळे प्रवाशांना आधुनिक, आरामदायी आणि सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पासाठी महामेट्रोची अंमलबजावणी प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, बांधकामासाठी तात्पुरते स्थलांतरित केलेले शिवाजीनगरबसस्थानक काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मूळ जागी सुरू करण्यात येणार आहे.
या प्रकल्पामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ करण्यासह पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे एकात्मिक आधुनिकीकरण होण्यास मदत होणार आहे.