
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारण प्रवर्गासह विविध प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना लाभ मिळेल, अशी स्वाधार योजना आणि वसतिगृहांचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही मंत्री सावे यांनी दिल्या.
दिव्यांग बालकांचे दिव्यांगत्व लवकर ओळखून त्यांना आवश्यक तपासणी, प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचार उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य, वैद्यकीय शिक्षण तसेच महिला व बालविकास विभागांच्या समन्वयातून शीघ्र हस्तक्षेप केंद्रे सुरू करण्याचे नियोजन आहे. याशिवाय वनार्टी व महाज्योतीच्या धर्तीवर स्वतंत्र संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करून उल्हासनगर, विरार आणि वर्धा येथील उपलब्ध जागांचा प्रशिक्षण केंद्रांसाठी उपयोग करण्याबाबत सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देशही मंत्री सावे यांनी दिले.
बैठकीला दिव्यांग कल्याण आयुक्त सत्यजित बडे, उपसचिव विष्णूदास घोडके, उपसचिव राजेश गायकवाड, उपायुक्त गाडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.