
खेलोइंडिया च्या माध्यमातून क्रीडा संस्कृती ग्रामीण भागातील गावागावांत पोहोचली असून, ग्रामीण खेळाडूंनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राज्य शासनाच्या ‘मिशन लक्ष्यवेध’ उपक्रमातून विविध खेळांसाठी उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात आली असून, अशा राष्ट्रीय स्पर्धांमुळे खेळाडूंना अनुभव आणि प्रगतीची संधी मिळत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

या स्पर्धेत मुलींच्या गटात तामिळनाडूने, तर मुलांच्या गटात उत्तर प्रदेशने विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात कर्नाटक उपविजेता, तर मुलांच्या गटात मध्य प्रदेश उपविजेता ठरला. यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये रौप्यपदक मिळविणाऱ्या महाराष्ट्राच्या यशदीप भोगे याचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी आमदार विक्रांत पाटील, आमदार शंकर जगताप, मनपा आयुक्त नवल किशोर राम, क्रिडा आयुक्त दीपक सांगला,बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव सुबिंदर सिंह गिल, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप जोशी उपस्थित होते.