
राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून दिलासा देण्यासोबतच शेतीसाठी सिंचनाचे पाणी, दिवसा खात्रीशीर वीजपुरवठा, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि बाजारपेठेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य आहे. शेतकरी टिकला तरच शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था टिकेल, या भूमिकेतून शासन शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.

अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर लाभ वर्ग करण्यात आले असून, पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. शेतकरी टिकला तर शेती टिकेल आणि शेती टिकली तर ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबरोबरच शेतीसाठी पाणी, दिवसा वीज, आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठेच्या सुविधा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती असून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करतानाच पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. चारा उपलब्धतेसाठीही सर्वांनी सहकार्य करावे, असेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.