
या आवाहनाला प्रतिसाद देत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईतील गोरेगाव पूर्वेकडील आरे मिल्क कॉलनी परिसरातील खांबांचा पाडा येथे आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी लहान मुलांना शैक्षणिक साहित्य, खेळणी, फटाके, बिस्किटे आणि सायकलींचे वाटप करून त्यांच्या आनंदात भर घातली.
निसर्गाच्या सान्निध्यात आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्याचा अनुभव आतापर्यंतच्या सर्वात खास दिवाळीच्या आठवणींपैकी एक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.