
यावेळी शेतकरी रंगनाथ नाना नवगिरे यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांना कपडे, फराळ, मिठाई देत आपुलकीने संवाद साधण्यात आला.
संकट कितीही मोठे असले तरी सामान्य माणसाला एकटे न सोडता त्याच्या अडचणीच्या काळात खंबीरपणे साथ देणे, हीच माणुसकी असल्याची भावना यावेळी पालकमंत्री शिरसाट यांनी व्यक्त केली.