
रोजगार हमी योजना, ग्रामस्थांच्या सहभागातून जलसंधारणाची कामे वर्षभर राबवावीत. तसेच पाणीसाठा वाढविण्यासाठी बंधाऱ्यांमधील गाळ काढण्याची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आढावा बैठकीत दिले.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, जलजीवन मिशनअंतर्गत ७० टक्के काम पूर्ण झालेल्या आणि उर्वरित कामांसाठी निधी आवश्यक असलेल्या योजनांना प्राधान्याने निधी मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वय साधावा. आगामी दोन वर्षे हवामानाच्या दृष्टीने आव्हानात्मक असण्याची शक्यता असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर आणि लोकसहभागातून जलव्यवस्थापनावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दुष्काळ निवारण उपाययोजना आढावा बैठकीस खासदार गोवाल पाडवी, आमदार आमश्या पाडवी, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, माजी खासदार डॉ. हिना गावित, बाल दिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘एक दिवसाच्या जिल्हाधिकारी’ या संकल्पनेतील एक दिवसाच्या जिल्हाधिकरी म्हणून आचल वसावे आदी यावेळी उपस्थित होते.