
राज्यातील शेतकऱ्यांनी सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत खचून जाऊ नये, कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. पुढील दहा महिन्यांतील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पिण्याचे पाणी, टँकर, आनंदाचा शिधा यांसह आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्यात येत आहे, अशी ग्वाही मंत्री डॉ. सामंत यांनी दिली.