
यावेळी त्यांनी कामगारांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली. तसेच पालावर चुलीवर स्वयंपाक करून कामगारांसोबत स्नेहभोजन केले. त्यांच्या या भेटीमुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी आमदार सुनील शेळके, संत तुकाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले, उपाध्यक्ष, संचालक, शेतकी अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने ऊसतोड कामगार उपस्थित होते.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे रोजगारासाठी गाव सोडून आलेल्या ऊसतोड कामगारांच्या पालावर जाऊन त्यांच्यासोबत सण साजरा करण्याचा हा प्रसंग कामगारांसाठी आनंददायी ठरला. यावेळी श्रीमती मुंडे यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरुपात महिलांना साडी भेट दिली. भाऊबीजेच्या निमित्ताने कामगारांच्यावतीने श्रीमती मुंडे यांना साडीचोळीची ओवाळणी भेट दिली.

श्रीमती मुंडे म्हणाल्या, दरवर्षी नेहमी कष्टकारी कामगारांसोबत दिवाळी साजरी करीत असते. काही दिवसांपूर्वी २२ वर्षाचा ऊसतोड कामगाराचा मृत्यू झाला, हे ऐकून मन सुन्न झाले. ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना शिक्षण, आरोग्यासाठी मदत व्हावी तसेच ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. ऊसतोड कामगारांच्या कष्टाला न्याय देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील आहे, आपल्या अडीअडचणीबाबत मोकळ्यापणे व्यक्त व्हा, असे सांगून श्रीमती मुंडे यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.