
बुलढाणा जिल्ह्यात फायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या वाहनांच्या वसुलीसाठी होत असलेल्या तगाद्याबाबत शासनाने कारवाई केली आहे. यासंदर्भात महसूलमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठका घेण्यात आल्याचे भरणे यांनी सांगितले. फायनान्स कंपन्यांचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करून यावर योग्य तो मार्ग काढतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.