
पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्यात आले असून जनावरांना भविष्यात चारा कमी पडू नये, यासाठी शासनाकडून मोफत चारा बियाण्यांचे वाटप करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी अधिकाधिक क्षेत्रावर चारा पिकांची लागवड करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.
दुष्काळी पार्श्वभूमीवर भाऊबीजेच्या दिवशी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील मुर्टी येथील सोनकरवस्तीवर जाऊन शेतकरी कुटुंबियांशी संवाद साधला. त्यांच्या घरात सर्वांसोबत दिवाळीचा फराळ आणि झुणका-भाकर खाऊन त्यांनी भाऊबीज साजरी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वासही त्यांनी दिला.
यावेळी उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार स्वप्नील रावडे, विविध विभागांचे अधिकारी, संभाजी नाना होळकर, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजवर्धन शिंदे, सरपंच तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.