
राज्यमंत्री बोर्डीकर यांनी मुलांच्या शिक्षण, आरोग्य आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधांची आस्थेने चौकशी केली. तसेच मुलांना उत्तम शिक्षण घेऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
बालगृहात पूर्वी वास्तव्यास असलेल्या वैजयंती कदम हिने कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते तिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे, सहाय्यक पोलीस आयुक्त भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढाकणे, पंचदीप बालग्रामच्या कार्याध्यक्ष मीनल टिपणीस यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी आणि बालगृहातील मुले उपस्थित होती.