
रोजगारासाठी पालकांच्या होणाऱ्या स्थलांतरामुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी विदर्भात अनेक ठिकाणी पालावरची शाळा चालविणाऱ्या भटके विमुक्त विकास परिषद, महाराष्ट्र व भटके विमुक्त कल्याणकारी परिषद, विदर्भ प्रांत यांच्या वतीने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
“मुंबईत आपण नेहरू विज्ञान केंद्र, सिद्धिविनायक मंदिर, विधान भवन पाहिले परंतु आज येथून पाहिलेला समुद्रच सर्वांना खूप आवडला,” अशी माहिती यावेळी मुलांनी राज्यपालांना दिली. भटके विमुक्त विकास परिषद ही संस्था भटक्या विमुक्त जमातीतील मुलामुलींच्या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना जीवनदान देण्याचे राष्ट्रकार्य करीत आहे असे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.
यावेळी राज्यपालांसमोर मांग गारुडी समाजातील ३० विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय पाठ म्हणून दाखवला. पाठांतर व उच्चाराबाबत राज्यपालांनी मुलांना कौतुकाची थाप दिली.