
गणेश विसर्जनाच्या मिरवणुका राज्यात सुरळीतपणे सुरू असून, मुंबई व पुणे शहरात पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकांनी चोख व्यवस्था केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही यंत्रणांचे कौतुक केले. तसेच महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील तसेच जगातील सक्षम पोलीस दलांपैकी एक असल्याचे त्यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांनी शिस्त आणि पर्यावरणपूरकतेच्या आवाहनाला प्रतिसाद देत गणेशोत्सव साजरा केल्याचे सांगितले. मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी विसर्जन सोहळ्याचे शिस्तबद्ध नियोजन केल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, महापौर रितू तावडे, खासदार मिलिंद देवरा, आमदार अमित साटम, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, आयुक्त अश्विनी भिडे, मुंबईच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि विविध देशांचे भारतातील महावाणिज्यदूत उपस्थित होते.