
यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनांसह अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या योजना आणि आयुष्मान कार्डबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांबाबत सोमनाथ आहेर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. वरिष्ठ सहायक संचालक वंदना थोरात यांनी लोकसंवाद उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करून अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. आयुष्मान कार्डबाबत वरिष्ठ सहायक संचालक मनीषा सावळे यांनी माहिती दिली.

पात्र लाभार्थ्यांनी कर्जाचे हप्ते वेळेत भरल्यास नियमानुसार पात्र व्याजाचा परतावा महामंडळामार्फत दिला जातो. या योजना ऑनलाइन व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. योजनेचा लाभ घेण्यासाठी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करून पात्रता प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा. पात्रता प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बँकेकडे कर्जासाठी अर्ज करता येतो.
नागरिकांच्या प्रश्नांना यावेळी उत्तरे देण्यात आली असून, शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.