
शहीदांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करण्यात आली. २६/११च्या हल्ल्याच्या वेळी मुंबईच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत शौर्याने दहशतवाद्यांचा मुकाबला करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, २६/११च्या घटनेनंतर दहशतवादाविरोधात न्यायालयात अनेक वर्षे जी लढाई लढली गेली, ती या चित्रपटाच्या माध्यमातून जनतेसमोर येणार आहे. हा केवळ मनोरंजनाचा विषय नाही तर हा एक संदेश देणारा चित्रपट आहे. आपल्या पोलिसांनी आणि न्यायव्यवस्थेने अत्यंत विचारपूर्वक संपूर्ण जगाला हे दाखवून दिले की, भारत हे असे राष्ट्र आहे जिथे कायद्याच्या माध्यमातून न्याय दिला जातो. विशेषतः उज्ज्वल निकम यांच्यामुळे शहिदांना न्याय मिळाला.
यावेळी खासदार ॲड. उज्ज्वल निकम, अभिनेते राजकुमार राव, मॅडडॉक फिल्म्सचे निर्माते-दिग्दर्शक, तसेच पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी आणि शहीद पोलिसांचे कुटुंबीय उपस्थित होते.