
पणनहंगाम २०२५-२६ मध्ये एमएसपी अंतर्गत धानासह ज्वारी, मका, बाजरी व रागीची खरेदी करण्यात आली असून, उपलब्ध आकडेवारीनुसार धानाची १ कोटी ३ लाख ८० हजार १९६.७० क्विंटल, ज्वारीची ५५ हजार १८३.७० क्विंटल, मक्याची १० लाख ५ हजार १११ क्विंटल, बाजरीची ५१०.५० क्विंटल आणि रागीची ४ हजार ६२४ क्विंटल खरेदी झाली आहे. रब्बी पणन हंगामात धान, ज्वारी व मक्याची मिळून १ कोटी ८ लाख २१ हजार ४०४.६० क्विंटल खरेदी झाल्याची नोंद आहे.
पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हमीभावाची रक्कम जमा करण्यासाठी प्रलंबित देयकांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी तसेच उपलब्ध निधी व प्रशासकीय कार्यवाहीचा आढावा घेऊन देयके प्राधान्याने अदा करावीत, असे निर्देश मंत्री भुजबळ यांनी दिले. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची हमीभावाची रक्कम वेळेत मिळणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी असून, प्रलंबित देयकांमध्ये अनावश्यक विलंब सहन केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.