
राज्यातील सर्व आरोग्य संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या औषध साठ्याची गुणवत्ता ड्रग डिटेक्शन मशीनद्वारे तपासण्यात येणार आहे. या तपासणीसाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात येणार असून पथकांद्वारे राज्यातील आठही परिमंडळातील संस्थेमध्ये तपासणी केली जाईल. प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून सर्व आरोग्य संस्थांमधील औषधांची गुणवत्ता यात तपासली जाणार आहे, असे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले.
मुंबईतील आरोग्यसेवा आयुक्तालयात आयोजित या बैठकीला राज्य वस्तू खरेदी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बापू पवार, आरोग्य संचालक (मुंबई ) डॉ. नितीन अंबाडेकर, आरोग्य संचालक (पुणे )डॉ. विजय कंदेवाड, सह संचालक सुनिता गोल्हाईत उपस्थित होते.