
‘विकसित भारत’ आणि ‘पंतप्रधान महोदयांनी केलेली सेवाकार्ये’ या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून रंगीबेरंगी कलाकृती साकारल्या. इयत्ता पाचवी-सहावी, सातवी-आठवी आणि नववी-दहावी अशा तीन गटांत झालेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘विकसित भारत’ आणि ‘पंतप्रधान महोदयांनी केलेली सेवाकार्ये’ या विषयांवर इयत्ता पाचवी-सहावी, सातवी-आठवी आणि नववी-दहावी अशा तीन गटांत चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. सुरुवातीला ९२४ शाळांमधील १ लाख १० हजार २०७ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती; मात्र प्रत्यक्ष स्पर्धेत १ लाख २७ हजार ५६९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मुंबईतील विविध मनपा शाळांमध्ये झालेल्या या स्पर्धेदरम्यान लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची पाहणी करून त्यांच्या कल्पकतेचे व कलागुणांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध शाळांना भेटी दिल्या. गुरुवार, दि. २४ सप्टेंबर रोजी प्रत्येक शाळेत उत्कृष्ट चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असून, प्रत्येक शाळेतील तीनही गटांतून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि पाच उत्तेजनार्थ अशी प्रत्येकी आठ, म्हणजेच एकूण २४ उत्कृष्ट कलाकृतींचा गौरव करण्यात येणार आहे.