
मराठीतील उत्कृष्ट साहित्यकृतींचा विविध भाषांमध्ये तसेच विविध भाषांतील उत्कृष्ट साहित्यकृतींचा मराठीत अनुवाद करण्यास प्रोत्साहन देणे, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे.

मराठी भाषेतील दर्जेदार वाङ्मय अन्य भाषांमध्ये गेले पाहिजे तसेच अन्य भाषांमधील वाङ्मयही आपल्या भाषेत आले पाहिजे. भाषेला समृद्ध करण्यासाठी अशा प्रकारचे आदान प्रदान महत्वाचे आहे. यावर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष असून यानिमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समग्र वाङ्मयाचा ग्रंथ हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगू, बंगाली आणि गोर बंजारा या सात भाषांमध्ये अनुवाद करण्यात येईल, अशी घोषणा मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली.