
या बैठकीत वरळीतील आरोग्य व्यवस्था, वाहतूक कोंडी, घनकचरा व्यवस्थापन, पार्किंग आणि उड्डाणपुलांची जोडणी यावर चर्चा करण्यात आली. वरळी धोबीघाट येथे प्रसुतिगृह आणि लहान मुलांचे विशेष रुग्णालय उभारावे. माता रमाई आंबेडकर हिंदू स्मशानभूमी येथील सुविधांचे बळकटीकरण, आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकासमोरील फूटपाथची कामे, कोस्टल रोड परिसरात उद्यानांची कामे तसेच देखभाल आणि सुशोभीकरण करणे, नेहरू सायन्स सेंटर मेट्रो स्थानकाजवळील डेब्रिज (कामाचा कचरा) हटवून जागा मोकळी करणे तसेच एमएमआरडीएने पालिकेला जागा हस्तांतरित करण्याचे निर्देश उपसभापती अहिर यांनी दिले.

सात रस्ता येथील मोनोरेल ब्रिज ते मेट्रो स्टेशनला जोडणी, पालिकेच्या वाहनतळांवर ‘पे अँड पार्क’ची सुविधा तसेच स्थानिकांसाठी सवलतीच्या दरात मासिक पास उपलब्ध करून देणे, डम्पिंग ग्राऊंडचा नवीन सुधारित आराखडा तयार करणे, मुंबईत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणे ही कामे तातडीने करण्याच्या सूचनाही उपसभापती अहिर यांनी दिल्या.
उपसभापतींच्या दालनात झालेल्या बैठकीस बृहन्मुंबई महापालिका आयुक्त, अश्विनी भिडे उपस्थित होत्या. बैठकीस महापालिकेचे संबंधित विभागाचे उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.