
विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी केले.
मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयात रोजगार महाकुंभ महाराष्ट्र आयोजित करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा आणि संबंधित विभागाचे सचिव उपस्थित होते.