
पायाभूत सुविधांची कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रकल्पांवरील किमान ५० टक्के काम यांत्रिकीकरणावर आधारित असावे. कौशल्याधारित कामगारांची उपलब्धता निश्चित करून मजुरांच्या तुटवड्यावर यांत्रिकीकरणातून उपाय शोधावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांसंदर्भात ‘मुख्यमंत्री कार्यालय वॉर रूम’ आढावा बैठकीस नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या.
मेट्रो मार्गिका २-ब मधील डी. एन. नगर ते चेंबूर मार्गावरील जुहू सर्कलजवळील गर्डरचे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यतेनुसार रविवारी १२ तासांच्या विशेष रस्ता ब्लॉकचे नियोजन करावे.

शिवडी ते वरळी उन्नत मार्गिकेची जोडणी ३१ मे २०२७ पूर्वी पूर्ण करून हा रस्ता नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करावा.
एमएमआरडीए, मुंबई महापालिका आणि अन्य यंत्रणांनी भूमिगत नागरी सुविधा घटकांचे अद्ययावत ‘ मॅपिंग ‘ करावे.
नागरी सुविधा किंवा पायाभूत सुविधांची कामे करताना ही माहिती सहज उपलब्ध होऊन प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी कमी होईल, अशी यंत्रणा विकसित करावी.
छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करताना शहरात प्रत्येक घराला नळजोडणी मिळेल याची दक्षता घ्यावी. नळ जोडणी देताना पुन्हा खोदकाम करावे लागणार नाही, अशा पद्धतीचे नियोजन करावे, असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत निर्देशित केले.