
सेवा संकल्प अभियानांतर्गत यातील १५० रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याचा शासनाचा प्रयत्न असून त्यासाठी आज त्यांनी या रुग्णवाहिकांची पाहणी करून त्यात उपलब्ध असलेल्या सेवांची माहिती जाणून घेत त्यात काही बदलही सुचवले.
संपूर्ण भारतीय बनावटीच्या या रुग्णवाहिकांमध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध आहेत. यात ईसीजी, ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर, पल्स ऑक्सिमीटर, सक्षन पंप, ऑक्सिजन वितरण प्रणाली तसेच हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी थेट संवाद साधण्याची सोयही आहे.
या योजनेंतर्गत एकूण १७५६ रुग्णवाहिका दाखल होणार असून त्यातील २५६ रुग्णवाहिका या ॲडव्हान्स लाइफ सपोर्ट उपलब्ध करून देणार आहेत उर्वरित सर्वसाधारण रुग्णवाहिका असतील.
यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, कुटंब कल्याण आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना आदी उपस्थित होते.