
या कक्षामध्ये प्राथमिक वैद्यकीय तपासणी, आवश्यक वैद्यकीय चाचण्या, प्राथमिक निदान आणि औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या सुविधेसाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात आरोग्य भवन येथे नुकतीच बैठक घेऊन प्रस्तावित वैद्यकीय कक्षाच्या उभारणीबाबत आढावा घेण्यात आला.
प्रस्तावित वैद्यकीय कक्षासाठी आवश्यक सुविधा, जागा, मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे आणि इतर बाबींची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आरोग्यसेवा आयुक्त दिल्ली येथे जाऊन महाराष्ट्र सदनाची पाहणी करणार आहेत. पाहणीनंतर आवश्यक त्या सुविधांचा आढावा घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल. या सुविधेसाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने तयार करून मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर वैद्यकीय कक्षाच्या उभारणीच्या कार्यवाहीला गती देण्यात येणार आहे. बैठकीत महाराष्ट्र सदनातील प्रस्तावित वैद्यकीय कक्षाच्या रचना, आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि प्रशासकीय कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात आली.