
नागरिकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणारे हे प्रकल्प आदरणीय दादांचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहेत. त्यामुळे या प्रकल्पांची कामे वेळेत, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अनिल पवार यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.