
मंत्रालयात मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली नदी पुनरुज्जीवनबाबत बैठक झाली. बैठकीस डॉ. राजेंद्र सिंह, सचिव एकनाथ डवले, डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, सचिव (लाभक्षेत्र विकास) प्रकाश मिसाळ यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‘चला जाणूया नदीला’ अभियानांतर्गत राज्यातील ३५ जिल्ह्यांमधील १०८ नद्यांचा अभ्यास करण्यात आला असून, स्थानिक नागरिक, विद्यार्थी, अभ्यासक, शास्त्रज्ञ व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सहभागातून तयार केलेल्या कृती आराखड्यांनुसार नदी संवर्धनाची कामे करण्यात येणार आहेत. लोकसहभाग, शास्त्रीय अभ्यास आणि प्रशासकीय समन्वयातून नद्यांना अविरल, निर्मळ व प्रवाही करण्यासाठी व्यापक अभियान राबविण्यात येणार असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.