
राज्यातील वाघ आणि बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी केंद्रीकृत यंत्रणा उभारून अतिरिक्त पथके तसेच स्वतंत्र टास्क फोर्स तयार करण्याची कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.
वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अमरावती वन विभागातील वाघिणीच्या हल्ल्याबाबत बैठक झाली.

बाधित परिसरात तातडीने पथक पाठवून परिस्थितीचा आढावा घ्यावा. सध्या इतर प्रक्रियांपेक्षा वन्यप्राण्यांचा बचाव आणि नागरिकांची सुरक्षितता यांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. वन्यप्राण्यांच्या हालचालींबाबत माहिती मिळालेल्या परिसरात तातडीने रेस्क्यू पथक पाठवावे. संपूर्ण कारवाईदरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी आणि कोणत्याही परिस्थितीत नागरिकांवर हल्ला होणार नाही, यासाठी यंत्रणा पूर्णपणे सतर्क ठेवावी, असे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार रवी राणा, आमदार प्रताप अडसद, आमदार गजानन लवटे, उमेश यावलकर, विधान परिषदेचे आमदार प्रवीण पोटे-पाटील, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार राजेश वानखडे, प्रवीण तायडे, केवलराम काळे, अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर, अमरावती वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी तसेच वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.