
पर्यावरणाचे भान ठेऊनच नवा महाराष्ट्र घडविण्याचे काम सुरु असून ‘ग्रीन कॅपिटल’ आणि तंत्रज्ञान घेऊन महाराष्ट्रात गुंतवणूक करा. महाराष्ट्राकडे असलेली मोठी बाजारपेठ, कुशल मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांची ताकद यांची सांगड घालून आपण पर्यावरणपूरक विकासाची नवी भागीदारी उभारूया, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी एक टीम म्हणून काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचा एफडीआयमधील वाटा आणखी वाढवण्याचे उद्दिष्ट असल्याचे नमूद करत त्यांनी ब्रिटिश उद्योगपती आणि गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणुकीचे खुले निमंत्रण उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक अर्थव्यवस्थेत आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. मोदी यांनी देशासमोरील मोठ्या आर्थिक आव्हानांचे संधीमध्ये रूपांतर केले. त्यांच्या दूरदृष्टीच्या आणि गतिमान नेतृत्वामुळे भारत आज जागतिक स्तरावर एक महत्त्वाची शक्ती म्हणून पुढे येत आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सुमारे दशकापूर्वी भारताचा समावेश जगातील ‘फ्रॅजाइल फाइव्ह’ म्हणजेच कमकुवत अर्थव्यवस्थांच्या गटात केला जात होता. आज भारत जगातील पाच मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये आहे. पायाभूत सुविधांचा विकास, डिजिटल सार्वजनिक सेवा, कर सुधारणा आणि गरजू नागरिकांना थेट मदत यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळाली आहे असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बॅरोनीस गीता नारगुंड ,लॉर्ड रेमिरेंजर, लॉर्ड रवेल, यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या परिषदेत ब्रिटनच्या संसदेतील खासदार, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नेते, विविध उद्योग व व्यावसायिक संस्थांचे प्रतिनिधी, उद्योजक, गुंतवणूकदार, व्यावसायिक तसेच भारतीय आणि ब्रिटिश समुदायातील मान्यवर सहभागी झाले.