
विद्यार्थ्यांना व युवकांना भारतीय संस्कृतीशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य स्पिक-मॅके करत असून, संस्थेचे कार्य आज अधिक प्रासंगिक असल्याचे राज्यपाल वर्मा यांनी सांगितले. तसेच, संगीतप्रेमी कुटुंबातून आले असून स्पिक-मॅके व इंटॅच संस्थेसोबत अनेक वर्षांपासून कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

१९७७ मध्ये स्थापन झालेल्या स्पिक-मॅके संस्थेचे मुख्य आश्रयदाते होण्याचे मान्य केल्याबद्दल संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्ष कुंदा माहूरकर यांनी राज्यपालांचे आभार मानले. पुढील वर्षी २०२७ साली स्पिक-मॅके स्थापनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत असून, आयआयटी दिल्ली येथे व त्यानंतर आयआयटी मुंबई येथे सुवर्णमहोत्सवी शिबिराचे आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शास्त्रीय संगीत व नृत्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेसह सृजनात्मक शक्तीला चालना देण्याचे कार्य संस्था करत असल्याचे संस्थापक डॉ. किरण सेठ यांनी सांगितले.
बैठकीला उद्योगपती शेखर बजाज, सांस्कृतिक विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, उपस्थित होते. बैठकीनंतर विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध शास्त्रीय गायिका परवीन सुलताना यांच्या गायनाचा कार्यक्रमही अनुभवला.