
महानगरपालिका मुख्यालयातील उपाहारगृह परिसरात तसेच जुन्या व नव्या इमारतींना जोडणाऱ्या पुलावर आयोजित या प्रदर्शनात खादीचे तयार कपडे, मध, पापड, लोणची, विविध खाद्यपदार्थ, हस्तनिर्मित दागिने, मॅग्नेट्स, चप्पल आणि हस्तनिर्मित फुले अशा विविध उत्पादनांची विक्री व मांडणी करण्यात आली आहे.
ग्रामीण उद्योजकांच्या कौशल्याला प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. मुंबईकरांनी प्रदर्शनाला भेट देऊन स्थानिक उत्पादनांची खरेदी करावी आणि ग्रामीण उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.