
विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत करण्यात येत असल्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आढावा बैठकीत सांगितले. या बैठकीत श्रावणबाळ योजनेसह विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, केवायसी प्रक्रिया, अर्ज करताना लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्या दूर करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विभागाशी संबंधित योजनानुरूप आवश्यक निधीसाठी पुरवणी मागण्यांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. योजनांसाठी आवश्यक आर्थिक तरतुदी आणि पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.
बैठकीस सामाजिकन्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे उपस्थित होते.