
मानवी मनातील भावभावना, अंतर्मनातील गोंधळ आणि विचारांचा कोलाहल चित्रांच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणारे चित्रकार भालेराव यांच्या या प्रदर्शनातील कलाकृती अत्यंत वेगळ्या धाटणीच्या असून, मानवी मनातील गुंतागुंत आणि अंतर्गत संघर्ष यांचा कलात्मक वेध घेणाऱ्या आहेत. प्रत्येक चित्राकडे पाहताना एक नवा विचार, नवी अनुभूती आणि कलेचा वेगळा पैलू उलगडत जातो, अशा भावना मंत्री ॲड. शेलार यांनी यावेळी व्यक्त केल्या. दरम्यान शेतकरी आणि ग्रामीण जीवनाचे वास्तव आपल्या कवितेतून अत्यंत नेमकेपणाने मांडणारे ख्यातकीर्त कवी इंद्रजीत भालेराव यांच्याशीही मंत्री ॲड. शेलार यांनी संवाद साधला.