
केवळ वैयक्तिक यश मिळवणे महत्त्वाचे नसून, ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी आणि प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी झाला पाहिजे. आज सन्मानित झालेली प्रत्येक व्यक्ती समाजासाठी आदर्श आहे. युवा पिढीने त्यांच्याकडून प्रेरणा घेणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे समाजातील सकारात्मक कार्याला प्रोत्साहन मिळते – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, रा.स्व. संघाचे अखिल भारतीय संघटन प्रभारी रामलाल यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
‘सर्वोत्तम नागरिक सन्मान-२०२६’ प्राप्त मान्यवर
हरिहरन, प्रा. ज्येष्ठराज भालचंद्र जोशी, मानद कॅप्टन योगेंद्र सिंह यादव, जया किशोरी, रवी किशन, लक्ष्मी अग्रवाल, संजीव कपूर, अशोक सराफ, डॉ. देवांश धनगर, सलीम मर्चंट, सुजय जयराज, डॉ. जलील डी. पारकर, केदार जोशी, सुभाष घई, अभिमन्यू सिंह, अहमद खान, भूमी पेडणेकर, अभिषेक सिंह.