
शेतकरी आत्महत्याग्रस्त १९ जिल्ह्यांतील पात्र एक हजार ५९३ लाभार्थ्यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा, तर १३३ बालकांना केंद्र शासनाच्या स्पॉन्सरशिप योजनेचा लाभ देण्यात येत आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी संबंधित जिल्ह्यांमध्ये विशेष अभियान राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिल्या.
यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.