
आराखड्याची अंमलबजावणी करताना आवश्यक भूसंपादनासह अनुषंगिक कामेही विहित कालमर्यादेत पूर्ण करून पाथरी तीर्थक्षेत्राचा एकात्मिक, नियोजनबद्ध आणि सर्वंकष विकास साधावा, असे निर्देश वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिले.
बैठकीस आमदार सईद खान, नगराध्यक्ष आसेफ खान, परभणीचे जिल्हाधिकारी (दूरदृश्य संवादप्रणालीद्वारे), जिल्हा नियोजन अधिकारी उमेश वाघमारे, पाथरी देवस्थानाचे प्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील नामांकित तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यांचा अभ्यास करून पाथरी तीर्थक्षेत्रासाठी सर्वंकष आणि एकात्मिक विकास आराखडा तयार करावा. आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या जागेचे भूसंपादन आणि त्यासंबंधित कामे प्राधान्याने व कालमर्यादेत पूर्ण करावीत. भूसंपादनासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करून शासनास सादर करावा, असे निर्देश राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी दिले.