
रायगड जिल्ह्यातील पुनर्वसित गावांसाठी ३९.३१ कोटी रुपयांची तरतूद असून, कोयना प्रकल्पग्रस्तांच्या वसाहती, पर्यायी शेतजमिनी, महसुली गावठाणाचा दर्जा आणि विविध दाखल्यांबाबतच्या प्रश्नांवरही कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री जाधव-पाटील यांनी दिले.
मंत्रालयात कर्जत येथील कोयना पुनर्वसित २२ गावांच्या संदर्भात मंत्री मकरंद जाधव-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी रायगडचे पालकमंत्री भरत शेठ गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघाचे आनंद मरागजे उपस्थित होते.