
महाराष्ट्राचे राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत वांद्रे-कुर्ला संकुलातील भारत डायमंड बोर्स येथे आयोजित हिरे व्यापार क्षेत्रातील उद्योजकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी भारत डायमंड बोर्सचे अध्यक्ष अनुप मेहता, जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष किरीट भन्साली, हिरे उद्योगाशी संबंधित उद्योजक आणि मान्यवर उपस्थित होते.
भारत हा जगातील हिऱ्यांचे उगमस्थान असून हिरे व्यापाराची हजारो वर्षांची परंपरा या देशाला लाभली आहे. अँटवर्प आणि भारत यांच्यातील हिरे व्यापाराचे संबंध अनेक दशकांपासून परस्परपूरक स्वरूपाचे राहिले आहेत. आज जगातील दहा पैकी नऊपेक्षा अधिक हिऱ्यांवर भारतात पैलू पाडले जातात, तर अँटवर्प हे जागतिक हिरे व्यापाराचे प्रमुख केंद्र म्हणून कार्यरत असल्याचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांनी सांगितले.

कार्यक्रमात भारत-बेल्जियम हिरे व्यापार संबंध अधिक दृढ करण्यासाठी सहकार्य वाढविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. दोन्ही देशांतील उद्योग, व्यापार आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात आगामी काळात नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.