
यावेळी मुख्यमंत्र्यांनी जपानचे हितोमी सातो, व्हिएतनामचे ले क्वांग बिएन, दक्षिण कोरियाचे डोंगवान यू, संयुक्त अरब अमिरातीचे अब्दुल्ला हुसेन अलमर्झुकी, ओमानचे महबूब अल रईसी, इटलीचे वॉल्टर फेरारा, तुर्कियेचे मुस्तफा केमालेत्तिन एरुयगुर, येमेनचे मोहम्मद ताहेर अब्दुलमोघ्नी, कतारचे अहमद साद अल-सुलैती, थायलंडच्या सिरीपोर्न सुपानी मत्विसेटकुल, फ्रान्सचे पॅट्रिक लेव्हेरीनो, पोलंडचे तोमाश व्हिएल्गोमास, जर्मनीचे ख्रिस्टॉफ हॅलियर, युक्रेनच्या अॅना झायचेन्को, आयर्लंडचे पॅट्रिक डफी, ब्राझीलचे रेल्सा पेलुती अलेंकार, इजिप्तच्या डालिया तवाकोल, चीनच्या चिन जी, नेदरलँडचे नाबिल ताउती, इराणचे सईद रझा मोसायेब मोत्लाघ, स्वीडनचे स्वेन ऑस्टबर्ग, नॉर्वेच्या मॉनिका नागेलगार्ड, श्रीलंकेच्या शिरानी अरियाराथ्ने, मलेशियाच्या नजवा मुस्यरीफाह रामली, इराकचे जुहैर साद अब्बास आणि बेल्जियमचे पियरे स्टीव्हर्लिंक या महावाणिज्यदूतांसह विविध देशांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

विविध विषयांवर सौहार्दपूर्ण चर्चा झाली. महावाणिज्यदूतांनी श्री गणेशाचे दर्शन घेत महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा अनुभव घेतला.
या भेटीस बांगलादेशाच्या उप उच्चायुक्त फरहाना अहमद चौधरी, ब्रिटनचे उप उच्चायुक्त कमलजीत कांग, अमेरिकेच्या उप महावाणिज्यदूत एरिन युसेन आणि फिनलंडच्या उप महावाणिज्यदूत जोन्ना सुनि यांचीही उपस्थिती होती. यावेळी मुख्य राज्य शिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव श्रीकर परदेशी, अमृता फडणवीस आदी उपस्थित होते.