
सुरीनाम देशात भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या लक्षणीय असून दोन्ही देशांमध्ये राजनैतिक, आर्थिक, व्यापारविषयक संबंध अतिशय दृढ आणि मैत्रीपूर्ण असे आहेत. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने येथे विविध क्षेत्रात व्यापार आणखी वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे हनीषा जयराम यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांना भेट दिली.
दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि मैत्रीपूर्ण संबंध आणखी वृद्धिंगत व्हावेत, अशी सदिच्छा यावेळी उपसभापती सचिन अहिर यांनी व्यक्त केली.