
योजनेअंतर्गत आतापर्यंत १५.८५ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर १३ हजार २७५ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. यापूर्वीच्या तीन याद्यांमध्ये २४ लाख ६७ हजार १३० शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. चौथी यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
संबंधित शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीची कर्जथकबाकी तपासून जवळच्या आपले सेवा केंद्रात आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येईल. राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांमधील काही कर्जखात्यांसाठी शासनाच्या ‘हेअरकट’ धोरणानुसारही कर्जमुक्तीची तरतूद आहे. तसेच मृत, वयोवृद्ध आणि बोटांचे ठसे नोंदविण्यात अडचण येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र मानक कार्यप्रणाली लागू करण्यात आली आहे.