
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभाग आणि उच्च शिक्षण विभाग तसेच कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या समारंभास केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांत मजूमदार, कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जयंत चौधरी, शिक्षण मंत्रालयाचे सचिव अनिल कुमार, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या सचिव देबाश्री मुखर्जी आदी उपस्थित होते.
शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना ज्ञान देत नाहीत, तर त्यांचे व्यक्तिमत्त्व, चारित्र्याला आणि विचारांना आकार देऊन सशक्त राष्ट्राची पायाभरणी करतात. अंदमान-निकोबारपासून लडाखपर्यंत दुर्गम आणि ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या समर्पण कौतुकास्पद आहे. भारताला जगाची ज्ञान आणि कौशल्याची राजधानी बनविण्यासाठी प्राथमिक स्तरापासूनच तंत्रज्ञान, नैतिक मूल्ये आणि कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
महाराष्ट्रातील सन्मानप्राप्त शिक्षक
🏆 डॉ. कविता नृसिंहराव गिट्टे – साने गुरुजी निवासी माध्यमिक विद्यालय, बीड,
🏆 कुंदा जयवंत बच्छाव – महापालिका शाळा, नाशिक,
🏆 वैभव वसंतराव कुलकर्णी – जवाहर नवोदय विद्यालय, लातूर,
🏆 शिवप्रसाद अरविंद टिंगरे – सैनिक स्कूल, सातारा,
🏆 डॉ. विक्रम विशाल – भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई,
🏆 डॉ. अमर मोहनराव ताकसांडे – जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय, दत्ता मेघे संस्था, वर्धा,
🏆 डॉ. संदीपान प्रल्हाद नरोटे – शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर,
🏆 किरण प्रकाश झरकर – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धाराशिव,
🏆अर्चना राकेश जाधव – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, त्र्यंबकेश्वर, नाशिक