
‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत शुक्रवार, ३० ऑक्टोबर, शनिवार, ३१ ऑक्टोबर तसेच सोमवार, २ नोव्हेंबर आणि मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२६ रोजी दररोज सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. तसेच ‘News On AIR’ या ॲपवरही ही मुलाखत ऐकता येणार आहे.
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही हा कार्यक्रम उपलब्ध होणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना, प्रस्तावित बालधोरण आणि एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठीच्या धोरणासह महिला व बालकल्याणाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, तंत्रज्ञानाचा वापर आणि तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करण्याबाबत या मुलाखतीत माहिती देण्यात येणार आहे.