
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक झाली. यावेळी मत्स्यविकास मंत्री नितेश राणे, विभागाचे सचिव एम. रामास्वामी, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, मच्छिमार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोस्टल रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छिमारांपैकी अद्याप काही जणांना नुकसान भरपाई मिळालेली नाही, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. याबाबत लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. राज्य शासन मच्छिमारांच्या पाठिशी असून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.