
यावेळी या प्रकल्पाच्या विकासाला गती देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात यावे, अशा सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

या प्रकल्पासाठी कंपनीने राजापूर येथे सुमारे १०० एकर जागा अधिग्रहित केली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीस महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.