
आदिवासी विकास विभागामार्फत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत विविध लोकाभिमुख उपक्रमांचे काटेकोर नियोजन करून प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
हे केवळ योजनांची माहिती देणारे अभियान न राहता, शासनाच्या सेवा आणि योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणारे लोकाभिमुख ठरावे. स्थानिक गरजा व उपलब्ध संसाधनांचा विचार करून अभियानाचे नियोजन करावे आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्याचा लाभ पोहोचेल यासाठी सर्व संबंधितांनी समन्वयाने काम करावे – मंत्री अशोक वुईके
बैठकीस आयुक्त लीना बनसोड, नागपूर, अमरावती, नाशिक व ठाणे विभागाचे अपर आयुक्त दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.