
नगरविकास विभागाच्या अखत्यारीतील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या बांधकामांसाठी वापरण्यात येणारी (बिल्डिंग प्लान मॅनेजमेंट सिस्टीम) बीपीएमएस अथवा ऑटो डीसीआर प्रणाली महाखनिज २.० पोर्टलशी जोडण्याचे निर्देश यापूर्वीच दिले असून विभागाने तातडीने आदेश काढून हे संलग्नीकरण पूर्ण करावे, असे निर्देश मंत्री बावनकुळे यांनी दिले.
महसूल मंत्री म्हणाले, संबंधित विभागांनी विविध प्रकल्प, कंत्राटदार आणि गौण खनिजांशी संबंधित माहिती महाखनिज २.० पोर्टलवर नोंदवून ती नियमित अद्ययावत ठेवावी. तसेच या विभागांनी स्वतंत्र ‘कन्झ्युमर’ म्हणून नोंदणी करावी.
यावेळी महसूल विभागाच्या सहसचिव मनिषा जायभाये आणि रेलटेल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला.