
मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून नागरिकांना वेळेत मदत मिळावी, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त (१० ऑक्टोबर) राज्यात ‘मनजागृती’ आणि ‘मनसंवाद’ या संदेशांतून मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. यंदाची जागतिक संकल्पना प्रत्यक्ष अनुभव असलेल्या व्यक्तींचे म्हणणे ऐकून त्यातून सकारात्मक बदल घडविण्याची आहे. मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करणाऱ्या व्यक्तींना केवळ ऐकून घेणे पुरेसे नसून, त्यांच्या अनुभवांना सेवा आणि निर्णयप्रक्रियेत स्थान मिळणे आवश्यक आहे.
मानसिक ताण, चिंता, नैराश्य तसेच अन्य मानसिक आरोग्यविषयक समस्यांबाबत मार्गदर्शन मिळावे, यासाठी टेली-मानस ही २४ तास उपलब्ध असलेली राष्ट्रीय हेल्पलाइन सुरू आहे. टेली-मानस हेल्पलाइन क्रमांक १४४१६ असा आहे.
सविस्तर वृत्त : https://mahasamvad.in/218353/